पैश्याचा हा खेळ
मांडला
खेळ यातला कधीच
हरवला
लागल्या बोल्या,
विकल्या निष्ठा
बाजार इथला भारीच
भरला
भलत्याच जागृत
ह्यांच्या संवेदना
उराला धरला फाटका
पंचा
चंद्र तारे सारेच
आलेत
रंगीत रंगांच्या
प्रयोगाला
वाहत गेले सारेच
भोळे
मदहोश झाला आसमंत
सारा
श्वास रोखुनी पाहती
सगळे
आधीच ठरलेला सामना
सूर कश्याला ? ताल
कश्याला ?
भान हरपले नुसत्या
हैदोसाला
गवसले तसे खूप
त्यांना
पण खेळामधला खेळ
हरवला....
-अभय आनंद साळवी
No comments:
Post a Comment