तो म्हणतो ....
आज फुलला चंद्रमा हा
पाहुनी चंद्रास
माझ्या
सौख्यं त्यास वाटले
कि
आता लाभेल त्यास
विसावा
भुलल्या साऱ्या
कळ्या हि
जेव्हा दरवळला सुवास
तुझा
बरसेल बघ आज गर्जून
उन्हाळ्यात तो ढग
खुळा
निरखुनि मज आज पाहू
दे
निसर्गाची हि कला
ये जरा जवळी असा
लाजऱ्या माझ्या फुला
ती म्हणते...
ऐन उन्हाळ्यात तुजला
हा कुठला नाद गवसला
छळू नकोस मज आज
सख्या
बघ चुलीवरचा भात
लागला
(ओतीन रंगात रंग
मेल्या पावसाळ्यात
तुझ्या)..मनात
चिंब भिजली घामाने
हि
तुलसीदासा तुझी
प्रिया
(वास नुसता वास येतो
मेल्या दारूचा
तुझ्या)..मनात
रागवू नकोस सख्या
फक्त २ महिन्यांचा
दुरावा
तो
म्हणतो....(मनातच)
(कर्म माझं चंद्र
म्हटलो
माझ्या ह्या धुसक्या
म्हशीला)
(फुल कसली हि तर
Flower Potच सारा)
(जोश्या साल्या
म्हटला होतास
कवितांनी भाळतात
ह्या)
(आता २ महिने वाट
पाहू
भावखाऊ पावसाची
त्या)
-अभय आनंद साळवी
No comments:
Post a Comment