२०१३ हे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी content wise आणि commercially दोन्ही बाजूने महत्त्वाचे ठरले. वर्षाची सुरुवात "बालक पालक" सारख्या चित्रपटाने आपलं नाणं तिकीट घरात खणखणीत वाजवून केली आणि पुढे "दुनियादारी" ने तो वारसा चालवला.
पण वर्षभरात जर ७०-७५ चित्रपट प्रदर्शित होत असतील तर त्यातले अवघे १०-१२ चित्रपट commercially जगतात तर मोजून ३-४ चित्रपट नफा कमावतात. हे खरंतर खूप गंभीर आहे आणि "हि Industry नक्की चालते तरी कशी ?" हा प्रश्न उत्पन्न करणारी हि बाब आहे. पण गेल्या काही वर्षांपासून हे चित्र सतत बदलतंय..social media आणि television media मुळे प्रेक्षक हळूहळू सिनेमागृहात येतोय हे हि तितकंच खरं. असो..पण मी चित्रपटांना फक्त आणि फक्त content च्याच आधारावर rate करतो.
तर सुरुवात गोडापासून करूया...खालील १० चित्रपट हे मला ह्या वर्षातले सर्वात आवडलेले मराठी चित्रपट:
Top 10 Marathi Movies of 2013 |
१) इन्व्हेस्टमेंट
रत्नाकर मतकरी लिखित, दिग्दर्शित "इन्व्हेस्टमेंट" हा चित्रपट मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वात POWERFUL चित्रपट. हा चित्रपट वास्तविक तर आहेच, पण हा पाहताना आपलं प्रेक्षक म्हणून होणारा भावनिक प्रवास शब्दात न मांडता येणारा आहे. आजच्या materialistic society च्या सणसणीत मुस्काटीत मारणारा हा चित्रपट आहे.
२) आजचा दिवस माझा
प्रशांत-अजित दळवी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "आजचा दिवस माझा" हा चित्रपट ह्या वर्षातला मी पाहिलेला सर्वात सुंदर चित्रपट. ह्याच चित्रपटातल्या एका संवादाप्रमाणे कुणीच न जाणाऱ्या दुर्लक्षित मंदिरात दिवा लावण्याइतकाच निर्मळ हा चित्रपट आहे. राजकारणी देखील माणूस असू शकतात हा जगावेगळा ROMANTIC विषय कुलकर्ण्यांनी सुंदर रित्या हाताळाय.
३) बालक पालक
रवी जाधव दिग्दर्शित "बालक पालक " एका एकांकीकेवर आधारित हा चित्रपट लोकांनी अक्षरशः उचलून घेतला आणि महाराष्ट्र भर याने कल्ला केला. एका अत्यंत BOLD विषयावर हा चित्रपट असला तरी ह्याची treatment हि trademark रवी जाधव style ची होती. रवी जाधव येत्या काही वर्षात दिग्दर्शक म्हणून एका वेगळ्याच उंचीवर असतील ह्यात काहीच शंका नाही. अडगळीत टाकलेले housefull चे boards single screen सिनेमागृहांच्या मालकांना शोधायला ह्या चित्रपटाने भाग पाडलं.
४) नारबाची वाडी
गुरु ठाकूर लिखित आणि आदित्य सरपोतदार दिग्दर्शित "नारबाची वाडी" हा चित्रपट मूळ बंगाली कथेवर आधारित असला तरी, माझ्या मते कोकणातल्या अस्सल लाल मातीतल्या माणसांची मजा पहिल्यांदाच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली.
५) ७२ मैल
राजीव पाटील आज आपल्यात नसले तरी जाताजाता "७२ मैल" हा आमच्या स्मरणात कायमचा राहील असा चित्रपट ते बनवून गेले. वास्तविकतेला cinematic दृष्टीकोन मिळाला कि प्रेक्षक त्याच्या प्रेमात पडतोच हे राजीव पाटील यांनी अनेक वेळा सिद्ध केलंय जे ते ह्या चित्रपटातून हि करतात.
६) संहिता
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर ह्या जोडीचा "संहिता" हा चित्रपट एखाद्या कवितेसारखा सादर केलेला आहे. ह्या जोडीने अनेक वर्षांपासून जी मनापासून चित्रपट बनवण्याची परंपरा चालवलीय, ती ह्या चित्रपटाने आणखी पुढे न्हेलीय.
७) अनुमती
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित "अनुमती" हा चित्रपट पाहताना तुमच्या मनात ACIDITY झालीच पाहिजे. म्हातारपण माणसाचं दुसरं बालपण असतं असं म्हणतात, पण ते फक्त परीकथेत असावं असं हा चित्रपट बघितल्यावर वाटतं.
८) चिंटू २
श्रीरंग गोडबोले यांचा "चिंटू २" हा चित्रपट म्हणजे खराखुरा बालचित्रपट. फारसी तामझाम नसून, महागडे vfx नसूनही एक चांगला adventurous चित्रपट बनवला जाऊ शकतो हे गोडबोल्यांनी सिद्ध केलंय.
९) प्रेमाची गोष्ट
वर्षाच्या सुरुवातीला आलेला हा सतीश राजवाडे यांचा "प्रेमाची गोष्ट" हा चित्रपट म्हणजे साधी, सरळ, सोप्पी पण सुंदर अशी प्रेम कहाणी. ह्या गोष्टीत ती दोघं प्रेमात कशी पडतात हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे जो अनेक lovestorys मधून सोयीस्कर रित्या वगळला जातो.
१०) पुणे ५२
उमेश विनायक कुलकर्णी यांची निर्मिती असलेला आणि नवोदित पण कर्तबगार दिग्दर्शक निखील महाजन यांचा "पुणे ५२" हा चित्रपट एका विशिष्ट वैचारिक ठेवण असलेल्यांसाठीच आहे असं काही नाही. महाजनांच्या दिग्दर्शनात हलकी हलकी "Master of Suspense" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर दिग्दर्शक Alfred Hitchcock यांची छाप आढळून येते.
ह्या १० मध्ये नसलेले पण प्रेक्षकांना आणि मलाही आवडलेले ह्या वर्षातले हे मी निवडलेले ८ चित्रपट:
Notable Omissions |
१) टाईम प्लीज
लग्नानंतर जोडप्यांच्या आयुष्यात येणारे बदल आणि त्यातून होणारे गैरसमज अश्या theme वर आधारित हा चित्रपट होता. एका नाटकाचा हा remake असला तरी ह्यात सिनेमा होता असं म्हणायला हरकत नाही.
२) दुनियादारी
ह्या चित्रपटाबद्दल काहीच बोलण्याची गरज नाही कारण जर तुम्ही मराठी प्रेक्षक आहात आणि हा चित्रपट आवडला नाही असं होणारच नाही.
३) तेंडूलकर आऊट
खरंतर क्रिकेटचा या कथेशी फारसा संबंध नव्हता पण पटकथाकार आणि दिग्दर्शक यांनी केलेला हा क्रिकेटमय प्रयोग वेगळा आणि मनोरंजन करणारा होता.
४) पोपट
खूप महत्त्वाचा असा एक social message ह्या चित्रपटात होता पण त्याचा वापर promotion साठी न करता लोकांना तो थेट सिनेमागृहात सिनेमाच्याच माध्यमातून cinematically दिला गेला.
५) खो खो
केदार शिंदेचा नवा खेळ म्हणून ह्याचं promotion केलं गेलं होतं. आता केदार शिंदेच्या चित्रपटातले लोकांना आवडणारे आणि समीक्षकांना न आवडणारे सगळे elements ह्यात होते.
६) पितृऋण
एका कन्नड कादंबरीवर आधारित हा चित्रपट आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत खुर्चीवर चिकटून ठेवतो. दिग्दर्शन जरी सामान्य दर्ज्याचं असलं तरी कथेच्या जोरावर हा चित्रपट आपण आपल्याबरोबर घेऊन जातो.
७) तुह्या धर्म कोंचा
धर्म ह्या विषयावर चित्रपट बनवणं म्हणजे आपल्या देशात खूप मोठं धाडसच आहे. चित्रपट अगदी प्रमाणिकपाने बनवलेला होता पण थोड्याफार प्रमाणात तो फसला असला तरी चित्रपटातलं वेगळेपण कौतुकास्पद आहे.
८) रामचंद्र पुरषोत्तम जोशी
अनेक वर्ष रखडलेला हा चित्रपट ह्या वर्षी अखेर प्रेक्षांच्या भेटीला आला. fantasy ह्या genre खूप कमी चित्रपट आपल्याकडे होतात त्यामुळे हे दिग्दर्शकाने केलेलं धाडसच होतं.
शेवट गोड नसावा असं माझं तत्व असल्यामुळे ह्या वर्षी जे काही माझा भ्रमनिरास करणारे चित्रपट होते त्यातले हे निवडक चित्रपट.
म्हणजे "नाव मोठं लक्षण खोटं" type चे:
Notable Disasters |
No comments:
Post a Comment